Punyatithi and Punyasmaran Message In Marathi | प्रथम पुण्यस्मरण मराठी संदेश

प्रथम पुण्यस्मरण मराठी संदेश : 

तर मित्रांनो आज आपण आपल्या या नवीन Post मध्ये पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन संदेश आणि प्रथम पुण्यस्मरण मराठी संदेश पाहणार आहोत. 

तर चला सुरवात करूयात आपल्या नवीन आर्टिकलला,


Punyatithi and 

Punyasmaran Message 

In Marathi |

प्रथम पुण्यस्मरण मराठी संदेश 


Pratham Punyasmaran Sandesh in Marathi
Pratham Punyasmaran Sandesh in Marathi


प्रेम देऊनी जगाला जवळ केले सर्वांना,

न उरली साथ आम्हाला, आठवण येते क्षणाक्षणाला,

कल्पनेतही नव्हते तुमचे जाणे, अधुरे राहिले जीवन गाणे,

आता फक्त एकच उरले तुमच्या स्मृतींना श्रद्धांजली वाहणे,

तुमच्या स्मृतींना आमची भावपूर्ण आदरांजली.


स्वप्नात सुद्धा वाटले नव्हते

तुम्ही आम्हास असे अचानक सोडून जाल,

वाटले नव्हते देवाचे बोलावणे येईल असे अचानक तुम्हाला,

प्रेम, माया, आपुलकी व माणुसकी या गोष्टींची ज्यावेळी चर्चा होईल,

त्यावेळी सर्वात अगोदर बाबा तुमची आठवण येईल.पवित्र स्मृतींची ज्योत तेवते,

अखंड आमच्या मनी,

सुगंध तुमच्या आदर्शांचा दरवळतो जीवनी

आठवुनी अस्तित्व, दिव्य, तव वृत्ती भारावली

कृतज्ञतेने आम्ही अर्पितो विनम्र श्रद्धांजली.


क्षणो क्षणी आता आमच्या मनी तुमचीच आठवण येत आहे,

हृदयात साठवलेल्या आठवणींना आता अश्रुद्वारे वाट मोकळी होत आहे.


तुमच असणं आमच्यासाठी सर्वकाही होतं

ते आमच्या आयुष्यातील एक सुंदर पर्व होते

आज सर्व काही असण्याची जाणीव आहे

पण तुम्ही नसणे ही मोठी उणीव आहे


Check Also -

Condolence Message in English


पुण्यतिथी निमित्त विनम्र 

अभिवादन संदेश


आता सहवास जरी नसला तरी स्मृति सुगंध देत राहील,जीवनाच्या प्रत्येक वळणावर आठवण तुझी येत राहिल.

भावपूर्ण श्रद्धांजली!


आज त्यांचा मोलाचा सहवास हरवला, त्यांच्या अश्या अचानक जाण्याने आम्ही सारे पोरके झाले आहोत, ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो हीच प्रार्थना. भावपूर्ण श्रद्धांजली


मुठीत मावल्या नाही उधळून गेल्यात स्मृती

इंद्रधनुष्याचे सारे रंग दाखवून गेल्या स्मृती

जाणीव नेणिवेच्या पलीकडे भेटवून गेल्या स्मृती

तोल ढळता ढळता सावरून गेल्या स्मृती

समोर सावलीशी दिसली बावरून गेल्या स्मृती

तमाची छाया घनदाट उजळून गेल्या स्मृती

वियोगाचा वणवा उरी पेटवून गेल्या स्मृती

ती शेज शरांची होती जगवून गेल्या स्मृती

कोमजले होते आत काही, उमलून गेल्या स्मृती

साथ कधीही सोडणार नाही सांगून गेल्या स्मृती


तुमच्या आयुष्यातील हा कठीण प्रसंग आहे देवाकडे इतकीच प्रार्थना की देव तुम्हाला त्यातून शांतता देवो. मनापासून शोक व्यक्त!


काळाचा महिमा काळच जाणे, कठीण तुझे अचानक जाणे.. आजही घुमतो स्वर तुझा कानी, वाहतांना श्रध्दांजली डोळ्यात येते पाणी… भावपूर्ण श्रद्धांजली


भावपूर्ण श्रद्धांजली संदेश 

मराठी Status


जशी वेळ निघून जाईल तशी जखम सुद्धा भरून येईल, पण आयुष्यभर येणाऱ्या त्यांच्या आठवणींना कुठलीच तोड नाही, त्यांच्या आठवणींचे झरे इतके की साखरही गोड नाही. भावपूर्ण श्रद्धांजली


आपल आमच्यावरच प्रेम आम्ही कधीच विसरू शकत नाही,

जितके कडक होता तुम्ही तितकीच माया केली सर्वांवर,

म्हणूनच आपल्यातील आपुलकी कधीच विसरता येत नाही.


सुरु आहे वाटचाल तुमच्या आशीर्वादाने

जीवन पथावर चालत राहू तुमच्या आदर्श संयमाने

सदैव जपतो आम्ही तुमच्या आदर्श व स्मृतीला

आपल्या पवित्र स्मृतीस भावपूर्ण श्रद्धांजलीपवित्र तुमची स्मृती

चिरंतन तुमची माया

नित्य असूद्या आमची वरती

अखंड तुमची छाया


आपल्या वडिलांना देवाज्ञा झाली ऐकून दुःख झाले, तो एक देवमाणुस होता. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो!


Condolence Message on 

Death in Marathi 


ज्योत अनंतात विलीन झाली, स्मृती आठवणींना दाटून आली.. भाव सुमनांची ओंजळ भरुनी, वाहतो आम्ही श्रद्धांजली..!


सूर्याप्रमाणे प्रकाश दिला सर्वास, अनेक सुखे घालून पदरात,

दुखे कवटाळून उरात तेजोमय जीवन यात्रा संपवली एका क्षणात,

अनेक सुखे असूनही पदरी आम्ही पाडतो अंधारात,

आपल्या चरणी आम्हा सर्वांची भावपूर्ण श्रद्धांजली.


जो आवडे सर्वांना, तोची आवडे देवाला

आमचे प्रिय ….. यांना भावपूर्ण श्रद्धांजलिकुटुंबातील दुःखद घटना मला त्याबद्दल आज माहिती मिळाली.

हे ऐकून खूप वाईट वाटले. देव आपण आणि कुटुंब शक्ती आणि धैर्य द्या


वाटले नव्हते कोणालाही असे अघटीत घडून जाईल,

चालता बोलता देव तुम्हास नेईन..

माणुसकी, स्नेह याची ज्यावेळी चर्चा होईल,

त्यावेळी सर्वात पहिली आठवण तुमची येईल..!


Check Also - 

Condolence Message in Hindi


Punyasmaran Message 

in Marathi


या दु: खाच्या वेळी आम्ही आपणास मनापासून शोक व्यक्त करू इच्छितो. आमचा देव तुम्हाला आणि तुमच्या प्रियजनांना सांत्वन देवो.


तुम्हाला आत्ता काय वाटले असेल याची मी कल्पना करू शकत नाही,

परंतु आम्ही फक्त एक फोन कॉल आहोत हे आपणास कळवावे अशी माझी इच्छा आहे.

माझे मनःपूर्वक दु: ख


भावपूर्ण श्रद्धांजली! त्यांच्या आत्म्यास चिर:शांती लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना !


देव मृत आत्म्यास शांती देवो ही … त्यांच्या कुटुंबास हा आघात सहन करण्याची ताकद देवो


जो गेला त्याचा आत्मा अमर झाला… देव त्या मृतात्म्यास शांती देवो…


Punyatithi Message in Marathi


जग सोडून जाणे आपल्या हातात नाही.. पण त्याच्या मृत्यू पश्चात त्याच्या आत्मशांतीसाठी मात्र आपण प्रार्थना करु शकतो.


नि:शब्द… भावपूर्ण श्रद्धांजली.. देव मृतात्म्यास शांती देवो..ज्योत अनंतात विलीन झाली,

स्मृती आठवणींना दाटून आली..

भाव सुमनांची ओंजळ भरुनी,

वाहतो आम्ही श्रद्धांजली..!


चांगल्या प्रभुने तिला गेल्या रात्री आमच्या

प्रिय आई आणि काकूंना कॉल केला.

देव तिच्या आत्म्याला शांततेत विसावा देवो. 


तुमच्या आयुष्यातील हा कठीण प्रसंग आहे देवाकडे इतकीच प्रार्थना की देव तुम्हाला त्यातून शांतता देवो. मनापासून शोक व्यक्त!


प्रथम पुण्यस्मरण मराठी संदेश 


आमच्या एखाद्या प्रिय व्यक्तीचे नुकसान कधीच सोपे नसते:

मी काहीही करु शकलो तर कृपया मला कळवायला अजिबात संकोच करू नका.


तो हसरा चेहरा , नाही कोणाला दुःखवले,मनाचा तो भोळेपणा, कधी नाही केला मोठेपणा, उडुनी गेला अचानक प्राण, पुनर्जन्म घ्यावा हीच आमची प्रार्थना.


कष्टाने संसार थाटला पण राहिली नाही साथ आम्हाला, आठवण येते प्रत्येक क्षणाला, आजही तुमची वाट पाहतो, यावे पुन्हा जन्माला.भावपूर्ण श्रद्धांजली!


तुमच्या नुकसानाविषयी ऐकून मला खरोखर वाईट वाटते

तुमची आई एक महान स्त्री होती आणि ती खरोखरच चुकली व नेहमीच लक्षात राहील.


तो आनंदी चेहरा, नाही कोणा दुखवले,

मनाचा होता मोठेपणा, नाही जमला कधी खोटेपणा,

सर्वांना जवळ केले, पाहता पाहता दूर देशी निघून गेले.

तुमच्या स्मृतींना आमची भावपूर्ण आदरांजली.

तर मित्रांनो हे होतें आपले Punyatithi and Punyasmaran Message In Marathi आणि प्रथम पुण्यस्मरण मराठी संदेश जर तुम्हाला हे आर्टिकल आवडले असेल तर नक्कीच तुम्ही तुमच्या मित्रांमध्ये ही post Share करा.